Belagavi

सुवर्णसौधच्या आवारात सूर्यनमस्कार अभियान   

Share

मकर संक्रांती आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बेळगावातील सुवर्णसौधच्या आवारात केंद्र सरकारच्या आयुष खात्यातर्फे शुक्रवारी सूर्यनमस्कार अभियान राबविण्यात आले.

होय,  केंद्र सरकारच्या आयुष खात्यातर्फे सुवर्णसौधच्या आवारात शुक्रवारी सकाळी सूर्यनमस्कार अभियान राबविण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सूर्यनमस्कार घालून या कार्यक्रमात सक्रिय भाग घेतला.

यावेळी बोलताना खा. मंगल अंगडी यांनी सर्वाना आधी मकर संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या. योग आणि सूर्यनमस्काराने शरीरातील मांसपेशी मजबूत होतात. त्यामुळे सर्वानी योग आणि सूर्यनमस्कार घालावेत. शरीरासाठी हा उत्तम व्यायाम आहे असे आवाहन केले.

कन्नड आणि संस्कृती खात्याच्या सहायक संचालिका विध्यावर्ती बजंत्री म्हणाल्या, संक्रांती हा भारतातील प्रमुख अर्थपूर्ण सणांपैकी एक सण आहे. या काळात सूर्य आपला मार्ग बदलतो. सूर्य हा सगळ्यांचा अधिपती असल्याने त्याला वंदन करण्यासाठी या सूर्यनमस्कार अभियानाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. बाईट यावेळी आयुष अधिकारी श्रीकांत, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी आणि सूर्यनमस्कारप्रेमी उपस्थित होते.