Chikkodi

श्रीशैलम येथे होणार कर्नाटकचे यात्री निवास : मंत्री जोल्ले

Share

 कर्नाटकातील भाविकांच्या सोयीसाठी आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथे सरकारतर्फे यात्री निवास बांधण्यात येणार असल्याची माहिती धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली.

चिक्कोडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र येडूर येथे श्री वीरभद्रेश्वर, श्री भद्रकालेश्वरी देवी आणि श्रीशैल जगद्गुरुंचे दर्शन घेतल्यानंतर ‘आपली मराठी’सोबत बोलताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, श्रीशैल मल्लिकार्जुन हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध तीर्थस्थळ आहे. कर्नाटकातील भक्त मोठ्या संख्येने तेथे दर्शनासाठी जातात. त्यामुळे या भक्तांना राहण्यासाठी, साहित्य ठेवण्यासाठी म्हणून कर्नाटकाचे यात्री निवास बांधण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशीच इच्छा आहे. श्रीशैल जगद्गुरूंसोबत या संदर्भात चर्चा केली आहे. लवकरच असे यात्री निवास उभारण्यात येईल असे मंत्री जोल्ले यांनी सांगितले.

यावेळी अजय सूर्यवंशी, अमर बोरगावे, मनोज किचडे, सचिन पाटील, अप्पू वनीरे, इरण्णा अम्मनगी, धोंडीराम बेडगे, दीपक इनामदार, नरसगौडा पाटील, मंजुनाथ दोडमनी आदी उपस्थित होते.