DEATH

वेसावची पारू पोरकी झाली; सुप्रसिद्ध लोकशाहीर काशीराम चिंचय यांचे निधन

Share

सातासमुद्रापार कोळी गीते लोकप्रिय करणारे सुप्रसिद्ध लोकशाहीर आणि पारंपारिक कोळी नाच गाण्यांचा बादशाह काशीराम लक्ष्मण चिंचय यांचे आज पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी हेमा, मुलगा सचिन आणि तीन विवाहित कन्या असा परिवार आहे. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर वेसावे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.

विजय कठीण आणि काशीराम चिंचय हे दोघे सोबत गाणी बनवायचे. त्यांच्या सर्व कॅसेट “वेसावकर आणि मंडळी” या नावाने व्हीनस कंपनीने प्रसिद्ध केल्या होत्या. या वेसावकर मंडळीने मानाची प्लॅटिनम डिस्कही मिळवली होती. फक्त भारतात नव्हे तर पारंपरिक कोळी, आगरी गाण्यांचा ठेका त्यांनी सातासमुद्रापार नेला. जात, धर्म, प्रांत या बाहेर जाऊन त्यांनी निर्माण केलेल्या कोळी संगीताच्या ठेक्यावर सगळ्यांना नाचायला लावले. सुप्रसिद्ध लोकशाहीर म्हणून काशीराम लक्ष्मण चिंचय यांना ओळखले जाते. कोळीगीत सातासमुद्रापार लोकप्रिय करण्यामागे त्यांचा मोठा वाटा होता. डोल डोलतंय वाऱ्यावर माझी, डोंगराच्या आडून एक बाई चांद उगवला, वेसावची पारू, हिच काय गो गोरी गोरी पोरी यासारखी अनेक कोळीगीतांचे ते गीतकार होते. मी हाय कोळी, सन आयलाय गो यासारखी अनेक कोळी गाण्यांचे ते गीतकार होते.