COVID-19

‘माय शुगर्स’बाबत मुख्यमंत्र्यांनी घेतली व्हर्च्युअल सभा

Share

मंड्या येथील माय शुगर्स कारखान्याला नवसंजीवनी देण्यासंदर्भात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी व्हर्च्युअल सभा घेतली.

कोरोनाची लागण झाल्याने गृह विलगीकरणात असलेल्या मुख्यमंत्री बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली आज बेंगळुरात मंड्या येथील माय शुगर्स कारखान्याला नवसंजीवनी देण्यासंदर्भात व्हर्च्युअल सभा पार पडली. या सभेत कारखान्याची आर्थिक स्थिती, कारखान्याला संजीवनी देण्यासाठी करावयाचे उपाय या संदर्भात चर्चा करण्यात आली. सभेला सहकार मंत्री एस. टी. सोमशेखर, मुख्य सचिव पी. रवीकुमार यांच्यासह सहकार व अन्य खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.