Dharwad

धारवाड प्रांताधिकारीपदी अशोक तेली रुजू

Share

 धारवाड प्रांताधिकारीपदी अशोक तेली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते प्रांताधिकारी डॉ. गोपालकृष्ण बी. यांच्याकडून त्यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली.

अशोक तेली हे मूळचे विजापूर जिल्ह्यातील बल्लोळी गावचे आहेत. २००४मध्ये त्यांनी कॉम्प्युटर सायन्स विषयात बी. ई. पदवी मिळवली. ८ वर्षे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केल्यानंतर त्यांनी सनदी परीक्षा दिली. २०१४च्या केएएस तुकडीचे ते अधिकारी आहेत. चिकबळ्ळापूर येथे प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून सनदी सेवा सुरु केलेल्या तेली यांनी आतापर्यंत जमखंडी तापंचे कार्यकारी अधिकारी, बेळगावचे प्रांताधिकारी, धारवाड येथे राष्ट्रीय महामार्ग विशेष भू संपादन अधिकारी, सवनूरचे प्रांताधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. फ्लो