Khanapur

धारवाड अपर जिल्हाधिकारीपदी शिवानंद भजंत्री

Share

धारवाड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून शिवानंद भजंत्री यांनी आज पदभार स्वीकारला

धारवाडचे अपर जिल्हाधिकारी म्हणून केएएस अधिकारी शिवानंद भजंत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. १९९९च्या केएएस तुकडीचे अधिकारी असलेल्या भजंत्री यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून सन्ग्लीश विषयात एम. ए. आणि एम. फील. या पदव्या मिळवल्या आहेत. त्यांनी खानापूरचे तहसीलदार, बैलहोंगलचे प्रांताधिकारी, कर्नाटक पाणी पुरवठा मंडळाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. आता त्यांची धारवाडच्या अपर जिल्हाधिकारीपदी बदलीवर नियुक्ती झाली आहे.