COVID-19

देशात एका दिवसात आढळले 2.59 लाख नवे रुग्ण

Share

देशात एका दिवसात आढळले 2.59 लाख नवे रुग्ण

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत देशात ज्या वेगाने रोज आढळणारे रुग्ण वाढत आहेत, त्याहीपेक्षा जास्त वेग मोठ्या शहरांत आहे. देशात सुमारे २० शहरांत संसर्गदर २०% पेक्षा जास्त आहे. म्हणजेच या ठिकाणी १०० चाचण्यांत सरासरी २० जण पाॅझिटिव्ह आढळत आहेत.

देशात प्रति एक लाख लोकसंख्येत १९ रुग्ण सापडत आहेत. गुरुग्राममध्ये प्रति एक लाख लोकसंख्येत १७९ रुग्ण आढळत आहेत. हे प्रमाण मोठ्या शहरांत सर्वाधिक आहे. कोलकात्यात रोज प्रति एक लाख लोकसंख्येत १५७, बंगळुरू अर्बनमध्ये १६३ रुग्ण, दिल्लीत १३९ रुग्ण, मुंबईत १३२ रुग्ण आढळत आहेत. तज्ज्ञांनुसार, ज्या वेगाने रुग्ण वाढत आहेत त्या हिशेबाने दिल्ली-मुंबईत पुढील आठवड्यात रुग्णसंख्या उच्चतम पातळीवर जाऊ शकते. दरम्यान, देशात कोरोनाच्या परिस्थितीवर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मागील व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉन अधिक संसर्गजन्य आहे. आरोग्यतज्ज्ञांची समिती स्थितीचे आकलन करत आहे. आपण सतर्क राहायला हवे. देशात १० दिवसांत ३ कोटी किशाेरवयीनांचे लसीकरण झाले आहे. देशात गुरुवारी काेरोनाचे २.५९ लाखापेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले. तर ३५२ रुग्णांचा मृत्यू झाला. हा २१ मे २०२१ नंतर नव्या रुग्णांचा उच्चांक आहे.