COVID-19

अखेर काँग्रेस पदयात्रा स्थगित

Share

मेकेदाटू प्रकल्पासंदर्भात काँग्रेसने आयोजित केलेली पदयात्रा स्थगित करण्यात आली आहे. या पदयात्रेत सहभागी झालेल्या अनेक काँग्रेस नेत्यांना कोविड बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ११ दिवसांची पदयात्रा ६ व्या दिवशीच स्थगित करण्यात आली आहे.

मेकेदाटू प्रकल्पासाठी काँग्रेसने हाती घेतलेली पदयात्रा पाचव्या दिवशीच स्थगित करण्यात आली आहे. हि पदयात्रा ११ दिवसांसाठी आयोजित करण्यात आली होती. मात्र पदयात्रेत सहभागी झालेल्या काही काँग्रेस नेत्यांना कोविड बाधा झाल्याने हि पदयात्रा मध्येच स्थगित करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांड आणि विरोधी सिद्धरामय्या तसेच केपीसीसी राज्याध्यक्ष डी के शिवकुमार यांनी सूचना दिल्या आहेत.

तिसऱ्या लाटेला प्रारंभ झाल्यापासून मुख्यमंत्र्यांनी एकही सभा घेणे थांबवले नाही. जत्रा यात्रा समारंभ राजकीय सभा झाल्या मात्र यावेळी कोणावरही कोविड नियमांचे उल्लंघन केल्यावरून तक्रार दाखल करण्यात आली नाही. काँग्रेस नेत्यांवर दाखल करण्यात आलेल्या तक्रारी या जाणीवपूर्वक दाखल केलेल्या असून काँग्रेसची पदयात्रा थांबविणे हाच त्यांचा उद्देश असल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.

यानंतर पुढे बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, आम्हाला जनतेची काळजी आहे. कोविड संकट कुणावरही ओढवू नये या दृष्टिकोनातून हि पदयात्रा स्थगित करण्यात आली असून कोविड परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पुन्हा रामनगरपासून ७ दिवस हि पदयात्रा होणारच असा ठाम विश्वास देखील सिध्दरामय्यांनी बोलून दाखविला.

यावेळी डी के शिवकुमार बोलताना म्हणाले, न्यायालयाने पदयात्रेवर निर्बंध घातले नसून कोविड परिस्थितीमुळे तात्कालिक वेळेसाठी हि पदयात्रा स्थगित करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी दिलेला पाठिंबा आम्ही पहिला आहे. आमचा लढा हा पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतकऱ्यांसाठी आहे. यामुळे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सदर पदयात्रा काही काळापुरती स्थगित करण्यात आल्याचे ते म्हणाले.

सत्ताधारी भाजपने काँग्रेसची पदयात्रा रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. परंतु काँग्रेसने अजूनही कोविड परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर हि पदयात्रा पार पडणारच असा पवित्रा घेतला आहे. कोविडची तिसरी लाट ओसरल्यानंतर काँग्रेस पदयात्रा यशस्वी करेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.