Crime

हुबळीत १ कोटीचे ड्रग्ज जप्त; युगांडाच्या महिलेला अटक

Share

 लहान मुलांच्या पूरक खाद्यपदार्थांच्या पॅकमधून ड्रग्जचा पुरवठा करण्याचा डाव बेंगळूर येथील एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी हाणून पाडला. या प्रकरणी मूळच्या युगांडा येथील एका महिलेला अटक करून .  कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.

होय, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटद्वारे भारतात ड्रग्जचा अवैध नशीला व्यापार करण्याचा प्रयत्न आज एनसीबी अधिकाऱ्यांनी हुबळी येथे हाणून पाडला. हुबळी रेल्वेस्थानक परिसरात मूळच्या युगांडाच्या व दिल्लीहून आलेल्या एका महिलेची झडती घेतली असता, तिच्याकडे सेरेलॉक या लहान मुलांच्या पूरक खाद्यपदार्थांच्या २ पॅकमध्ये प्रत्येकी ९९५ ग्रॅम वजनाचे मादक पदार्थ आढळून आले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १ कोटी ५ लाख रुपये आहे. ते जप्त करून एनसीबी अधिकाऱ्यांनी महिलेला अटक करून चौकशी चालवली आहे.