National

संजय राऊत कडाडले ! शिवरायांच्या अवमानाचा निषेध हा राजद्रोह कसा?

Share

 छत्रपती शिवरायांच्या अवमानाचा निषेध करणे हा राजद्रोह कसा ठरतो? श्रीयुत बोम्मई, मी स्पष्ट सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुमचीही सुंता झाली असती अशा कठोर शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत कडाडले.

होय, बेंगळुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात निषेध नोंदविला होता. या दोन्ही संघटनांच्या ३८ कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी अटक करून विविध कलमांखाली गुन्हे नोंदविण्यात आले. त्यानंतर कन्नड संघटनांच्या दबावाखाली येऊन या कार्यकर्त्यांवर सरकारने राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शिवरायांच्या अवमानाचा निषेध करणे हा राजद्रोह कसा ठरतो असा सवाल राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. भाजप दुटप्पी भूमिका घेतेय.   शिवाजी महाराज होते म्हणून हिंदू धर्म टिकला असे काशीत जाऊन पंतप्रधान मोदी म्हणतात आणि त्यांच्याच भाजपशासित कर्नाटकात शिवरायांच्या पुतळ्याच्या  विटंबनेचा निषेध करणाऱ्या बेळगावातील ३८ कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात येतो. देशद्रोहाचे कलम भाजप शासित राज्यांत खूप स्वस्त झाले आहे. महाराष्ट्र सरकारने या कार्यकर्त्यांना वकील पुरवून कायदेशीर मदत करावी अशी मागणी मी या आंदोलनातील एक कार्यकर्ता म्हणून करतो असेही राऊत यांनी सांगितले. बाईट

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी बेळगावातील अटक केलेल्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचे कलम लावल्याबाबत महाराष्ट्राने कठोर भूमिका घेण्याची मागणी करून कार्यकर्त्यांना कायदेशीर मदत पुरवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या भूमिकेचे सीमाभागातील मराठी जनतेतून स्वागत होत आहे.