Belagavi

पंचमसाली आरक्षणाला विलंब; जयमृत्यूंजय स्वामी-मुख्यमंत्र्यांची बैठक

Share

 पंचमसाली समाजाला आरक्षण देण्याबाबत विलंब होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंचमसाली पीठाचे जयमृत्यूंजय स्वामी, समाजाचे आमदार यांची मुख्यमंत्र्यांसमवेत महत्वाची बैठक आज सायंकाळी बेळगावात झाली

व्हॉईस ओव्हर : विधिमंडळाचे कामकाज संपल्यावर सायंकाळी उशिरा बेळगावातील एका खासगी हॉटेलमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासमवेत पंचमसाली पीठाचे जयमृत्यूंजय स्वामी, समाजाचे आमदार यांची महत्वपूर्ण चर्चा झाली. प्रारंभी स्वामीजींनी मुख्यमंत्री बोम्मई यांचे भगवी शाल घालून स्वागत केले. यावेळी पंचमसाली पीठाचे जयमृत्यूंजय स्वामी, समाजाचे आमदार व नेत्यांनी लिंगायत पंचमसाली समाजाला आरक्षण देण्यात होत असलेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त करून त्वरित निर्णय घेण्याची विनंती केली. या संदर्भात बेळगावात सुरु असलेल्या अधिवेशनातच चर्चा घडवून निर्णय घेण्याचा आग्रह त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला. यावेळी पंचमसाली समाजाचे आ. सिद्धू सवदी, आ. महेश कूमठल्ली, माजी आ. विजयानंद काशप्पणावर, माजी आ. राजू कागे, खा. इरण्णा कडाडी आदी उपस्थित होते.