State

सरकारी शाळांत संसर्ग नाही; घाबरण्याची गरज नाही : शिक्षणमंत्री बी. सी. नागेश

Share

खासगी निवासी शाळा आणि नवोदय विध्यालयातच कोरोनाचा संसर्ग आढळून आला आहे. त्या तुलनेत सरकारी शाळांत धोका कमी आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही असे प्राथमिक माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी सांगितले.

सोमवारी विधानसौधमध्ये पत्रकारांशी बोलताना शिक्षणमंत्री बी. सी. नागेश म्हणाले, पहिली ते दहावीपर्यंतच्या सरकारी शाळांमध्ये कोरोना संसर्ग आढळलेला नाही. खासगी निवासी आणि नवोदय शाळांत संसर्ग आढळला आहे. पण मुलांना त्रास झालेला नाही. आणखी दोन शिक्षकांना संसर्ग झाल्याचे निदान आले आहे. त्यांच्यावर समर्पक उपचार करण्यात येत आहेत. सरकार सर्व दक्षता घेत आहे. आजच अधिकाऱ्यांशी चर्चा करून कोविड मार्गसूचीचे कडक पालन करविण्याच्या सूचना दिल्या आहेत असे त्यांनी सांगितले

विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर मीसुद्धा संसर्ग आढळलेल्या निवासी आणि नवोदय शाळांना भेटी देणार आहे. सध्या खासगी निवासी शाळांमध्ये एसओपीचे पालन झाले की नाही याची खातरजमा करण्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहे असे मंत्री नागेश म्हणाले.

एकंदर ओमीक्रॉनच्या प्रवेशाने जगभरात खळबळ माजविली असताना कोरोनाने राज्यातील काही शाळांना लक्ष्य केल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे हे मात्र खरे !