Belagavi

मानव बंधुत्व वेदिकेतर्फे अंधश्रद्धा विरोधी परिवर्तन दिन

Share

बेळगावात मानव बंधुत्व वेदिकेच्या वतीने सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन गांभीर्याने पाळण्यात आला.
व्हॉईस ओव्हर : होय, भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाला न्याय, मूलभूत अधिकार आणि खऱ्या अर्थाने जगण्याचे स्वातंत्र्य देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मानव बंधुत्व वेदिकेच्या वतीने अंधश्रद्धा विरोधी परिवर्तन दिन म्हणून पाळण्यात आला.

यानिमित्त सदाशिवनगरातील बुध्दविहारात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महामानवाला अभिवादन करण्यात आले. फ्लो याप्रसंगी बोलताना मानव बंधुत्व वेदिकेचे पदाधिकारी रवींद्र नायकर यांनी, सामाजिक, धार्मिक अंधश्रद्धा आणि कुप्रथा तसेच त्यामुळे होणारे अनिष्ट परिणाम याबाबत माहिती दिली. बुद्ध, बसव, बाबासाहेबांसारख्या नेत्यांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल केल्यासच अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्ती मिळेल असे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी मानव बंधुत्व वेदिकेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.