hubali

देशात आता काँग्रेसचे आयुष्य अत्यंत कमी : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

Share

देशात काँग्रेसचे अस्तित्व कमी होत आहे. मोदी आणि भाजपाविरोधात ते केवळ आंदोलन करत आहेत, अनेकजण काँग्रेला सोडून दूर जात आहेत, देशात आता काँग्रेसचे आयुष्य अत्यंत कमी असून आगामी काळात भारत काँग्रेस मुक्त होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केलाय.

धारवाड, गदग आणि हावेरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांचा भाग म्हणून कुंदगोळ परिसरातील विश्वगुरू बसवण्णा कल्याण मंटपात भाजप धारवाड ग्रामीण जिल्ह्याच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी बोलत होते. युपीए म्हणजे काय? आता युपीए शिल्लक नाही असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. काँग्रेस डबघाईला जात असल्याचे सर्वांना माहित असून इतर पक्ष काँग्रेसपासून थोडे लांब रहात असल्याचेही ते म्हणाले. काँग्रेसला स्वतःच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नेमाने जमत नाही. इतकी वाईट वेळ काँग्रेसवर आली आहे, अशी खिल्ली प्रल्हाद जोशींनी उडविली.

राज्यभरात होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीसंदर्भात प्रतिक्रिया देताना प्रल्हाद जोशी म्हणाले, २० उमेदवार या निवडणूक रिंगणात असून कमीतकमी १६ उमेदवारांच्या विजयाचा विश्वास आहे. धारवाड जिल्ह्यात भाजपने उत्तम कार्य केले आहे. अखंड धारवाड जिल्ह्याचे भाजपचे उमेदवार प्रदीप शेट्टर यांना अधिकाधिक मते देऊन अभूतपूर्व मतांनी विजयी करा, असे आवाहन प्रल्हाद जोशी यांनी केले.