Belagavi

जुने बेळगाव येथील अनधिकृत वाईनशॉप बंद करण्याची मागणी : नागरिकांनी छेडले आंदोलन

Share

जुने बेळगाव व माधवपूर येथील अनधिकृत दारू दुकान तातडीने पावले उचलून बंद करण्यासाठी येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी, आयुक्त व महसूल अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

जुने बेळगाव परिसरात आणि माधवपूर परिसरात अनेक अनधिकृत वाईन शॉप आहेत. याचा या भागातील तरुणांवर दुष्परिणाम होत आहे. तसेच या भागात काही अनैतिक कृत्ये सुरु आहेत. यामुळे या परिसरात असलेली हि वाईनशॉप तातडीने बंद करण्यात यावीत, असा आग्रह करून जिल्हाधिकारी, आयुक्त आणि महसूल अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यासंदर्भात माहिती देताना जितेंद्र चौगुले म्हणाले, बेळगावमधील नाक्यानाक्यावर अनेक अनधिकृत वाईनशॉप सुरु आहेत. या परिसरात अनैतिक कृत्येही घडत असून याच प्रकरणातून या गावातील सुरज गौंडवाडकर नामक युवकाची हत्या करण्यात आली आहे. हि सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन तातडीने हे वाईनशॉप बंद करण्याची मागणी आपण करत असल्याचे चौगुले यांनी सांगितले.

याचप्रमाणे या गावचे ग्रामस्थ बोलताना म्हणाले, जुने बेळगाव नाक्यावर अनधिकृत वाईनशॉप सुरु आहे. या वाईनशॉपमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नजीकच बस स्टॉप असल्याने येथे येणाऱ्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या भागातून मार्गस्थ होणाऱ्या महिलांनाही हे वाईनशॉप डोकेदुखी ठरले आहे, त्यामुळे हे वाईनशॉप तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर वाईनशॉप बंद करण्याची मागणी जुनेबेळगाव, माधवपूरमधील नागरिकांनी केली असून यासंदर्भातील निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, आयुक्त आणि महसूल अधिकाऱ्यांना दिले आहे. हे निवेदन सादर करताना या भागातील अनेक नागरिक उपस्थित होते.