COVID-19

ओमीक्रॉनचा सामना करण्यास राज्य सरकार सज्ज : मुख्यमंत्री

Share

कोविडचा रूपांतरित विषाणू ओमीक्रॉनचा सामना करण्यास राज्य सरकार सज्ज असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.

सोमवारी बिदर जिल्ह्यातील भालकी येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, ओमीक्रॉनचा सामना करण्यासाठी सरकार तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार उपाय करत आहे. क्लस्टर निर्माण करण्यासंदर्भात मार्गसूची जारी केली आहे. चिक्कमंगळूर येथे काळ क्लस्टर निर्माण केले असून ओमीक्रॉन बाधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पावले उचलली आहेत. वरचेवर तज्ज्ञांच्या संपर्कात राहून आवश्यक पावले उचलण्यात येतील असे बोम्मई यांनी स्पष्ट केले.

विधान परिषद निवडणुकीसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, भाजप लढवीत असलेल्या विधान परिषदेच्या सर्व जागा जिंकेल.  एकंदर ओमीक्रॉनचा सामना करण्यास राज्य सरकार सज्ज असल्याचे सांगतानाच विधान परिषदेच्या सर्व जागा भाजप जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.