Banglore

आंबेडकरांमुळे राज्यघटनेतून प्रत्येकाला खरे स्वातंत्र्य : मुख्यमंत्री

Share

राज्यघटनेच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे पितामह ठरले असे गौरवोद्गार मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काढले.

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.

डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, डॉ.. आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली नसती तर देशात लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवणे अवघड झाले असते. सर्वांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून देणारी घटना त्यांनी लिहिली. त्यामुळेच त्यांना आधुनिक भारताचे पितामह म्हणावे लागेल. आरंभीच्या काळात त्यांना जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. ते दुःख इतर कोणाच्या वाट्याला येऊ नये या उद्देशानेच त्यांनी देशासाठी जगात आदर्श ठरेल अशी घटना लिहिली. त्याबद्दल देशातील १३० कोटी जनतेने त्यांचे चिरऋणी राहिले पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले.