Chikkodi

अलीकडे सिद्धरामय्या खोटे बोलण्यास शिकत आहेत : रमेश जारकीहोळी

Share

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आजही आमचे नेते आहेत. परंतु आजकाल त्यांच्या खोटे बोलण्यात वाढ होत चालली असून अनेकवेळा ते खोटे बोलत चालले आहेत, असे विधान माजी मंत्री आणि आमदार रमेश जारकीहोळी यांनी केले आहे.

रायबाग परिसरातील महावीर भवनमध्ये अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. सिद्धरामय्या हे आमचे नेते आहेत. आमचे गुरु आहेत. परंतु आजकाल ते खूप खोटे बोलायला शिकत आहेत. काल रायबागमध्ये सिध्दरामय्यांनी म्हटले कि, विवेकराव पाटील यांचा काँग्रेसशी संबंध नाही. परंतु मी कोल्हापूर अंबाबाईसमोर शपथ घेऊन सांगतो, कि विवेकराव पाटील काँग्रेसचेच सदस्य आहेत, असे रमेश जारकीहोळी म्हणाले.

मागील विधानपरिषद निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षातर्फे विवेकराव पाटील यांनी उमेदवारी देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. परंतु वीरकुमार पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली. विवेकराव पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक आले. यानंतर सिध्दरामय्यांनी विवेकराव पाटील हे काँग्रेससाठी काम करत असल्याचे सांगितले. तर आता विवेकराव पाटील यांचा काँग्रेसशी संबंध नसल्याचे बोलले जात आहे, या वक्तव्याबाबत मी नाराज असल्याचे रमेश जारकीहोळी म्हणाले.

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची जोरदार रणधुमाळी रंगात आली असून यादरम्यान अनेक नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोप करण्यात येत आहेत. आपल्या पक्षाच्या विजयासाठी मतयाचना करण्यात येत आहे. निवडणूक होण्याआधीच निकालासंदर्भात अंदाज लावण्यात येत आहेत. आता निवडणुकीत कोणाच्या बाजूने पारडे जड होईल, हे पाहणे बाकी आहे.