Athani

अथणी नगरपालिका निवडणुकीची तयारी : सवदी, कुमठहळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली बैठक

Share

राज्यात विधानपरिषद निवडणुकीनंतर नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांना निवडणूक आयोगाने ग्रीन सिग्नल दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक झाल्यानंतर या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

अथणी परिसरातील स्पोर्ट्स क्लब येथे अथणी नगरपालिकेच्या २७ वॉर्डसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पूर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आमदार महेश कुमठळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली हि बैठक पार पडली. यावेळी इच्छुक उमेदवारांचे अभिप्राय घेण्यात आले. यावेळी वॉर्ड क्रमांक ८ साठी दिलीप लोणारे यांना उमेदवारी देण्यासंदर्भात स्थानिकांनी मागणी केली.

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना लक्ष्मण सवदी म्हणाले, ज्यांना वॉर्डच्या समस्यांची जाणीव आहे अशा इच्छुकांना प्राधान्य देण्याची सूचना निवड समितीने दिली आहे. सर्व समाजच्या प्रतिनिधींना उमेदवारी देण्यात येईल, असे लक्ष्मण सवदी यांनी स्पष्ट केले. गेल्या काही वर्षांपूर्वी पेट्रोल पंपच्या माध्यमातून पंधरा कोटी रुपये नगरपालिकेच्या विकासासाठी देण्यास तयार होते. परंतु यावेळी लक्ष्मण सवदी यांचे नाव या विकासाला देण्यात येईल, या कारणास्तव काही अधिकाऱ्यांनी याची ब्ल्यूप्रिंट तयार केली नाही. हे पैसे परत जाऊ नयेत यासाठी कल्पना लढवून पन्नास लाख रुपयांच्या खर्चातून स्पोर्ट्स क्लबची निर्मिती करण्यात आली. या कार्यात सहकार्य देणाऱ्या अथणी शहराचे आपण आभारी असल्याचे मत लक्ष्मण सवदी यांनी व्यक्त केले.

यानंतर बोलताना आमदार महेश कुमठळ्ळी म्हणाले, अथणी नगरपालिका निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवार आहेत. उमेदवारी कुणालाही जाहीर झाली तरी सर्वांनी एकसंघ होऊन हि निवडणूक लढवून भाजपाला बहुमतांनी विजयी करण्यासाठी प्रयत्न करूया, कोणीही बंडखोरी करू नका असे आवाहन महेश कुमठळ्ळी यांनी केले.  या बैठकीला शिवकुमार सवदी, अनिलराव देशपांडे, चिदानंद सवदी, आनंद टोनप्पी, डॉ. मल्लिकार्जुन हंजी, निंगाप्पा खोकले, सिद्दप्पा मूदकन्नावर, अन्नासाब नायक, रामनगौडा पाटील, सुशीलकुमार पत्तार, दिलीप लोणारी, दत्त वास्पर आदी उपस्थित होते.