Vijayapura

विजापूर जिल्ह्यातील सरकारी शाळेचा आदर्श इतर सरकारी शाळा घेतली का?

Share

अनेक सरकारी शाळांमध्ये मूलभूत सुविधांच्या अभावामुळे पालक पाठ फिरवतात. ज्यांना खाजगी शाळेचे शिक्षण परवडत नाही असे पालक विद्यार्थ्यांना सरकारी शाळेत घालतात. परंतु बहुतांशी सरकारी शाळेमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही फरफट होते. मात्र या गोष्टीला फाटा देत अपवाद ठरली आहे ती विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील नाद के डी येथील सरकारी माध्यमिक शाळा… इतर सरकारी शाळांपेक्षा वेगळ्या असणाऱ्या या सरकारी शाळेचे वैशिष्ट्य आहे तरी काय?…. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या विशेष आढाव्याचा पाहुयात हा विशेष रिपोर्ट…!

भीमा नदी तीरावर असलेली केडी गावातील हि शाळा लक्षवेधी आहे. या शाळेच्या प्रवेशद्वारात प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला हिरवागार निसर्ग अनुभवायला मिळतो.सुमारे दोन एकर जागेत २००७ साली सुरु करण्यात आलेली हि शाळा अत्यंत ख्यातनाम अशी आहे. २०१० साली या शाळा परिसरात रोपांची लागवड करण्यात आली. या सर्व रोपांचे संगोपन अत्यंत उत्तम प्रकारे करण्यात आले असून शाळेच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्गदेखील या रोपांची विशेष काळजी घेतात. वेळोवेळी झाडांना पाणी घालणे, त्यांच्या संगोपनाची जबाबदारी उत्तमप्रकारे पाड पाडली जाते. सध्या शाळा परिसरात जवळपास ७०० प्रकारची विविध प्रकारची झाडे आहेत. विजापूर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून परिचित आहे. २०१३ साली पडलेल्या दुष्काळादरम्यान या रोपांना वाचविण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. यानंतर विहीर खोदण्यात आली असून आता येथील झाडांना पाण्याची कमतरता भासत नाही. नाही. या झाडांच्या संगोपनासाठी शेणखताची व्यवस्था देखील करण्यात येत असून शाळेचा परिसर हिरवागार ठेवण्यामध्ये शाळेच्या संपूर्ण टीमचे यश असून याबाबत या शाळेचे शिक्षक रामचंद्र बिरादार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे… ते पाहुयात…

विजापूर जिल्ह्यातील सदर शाळा भिमानदीतीरावरील अशा परिसरात आहे, जो परिसर रक्तपातासाठी कुप्रसिद्ध असा आहे. परंतु अशा परिसरात विद्येचे मंदिर उभारून अशा पद्धतीने शाळेची प्रगती साधणे हे कौतुकास्पद कार्य आहे. या सरकारी शाळेत आपल्या मुलांनी शिकावे अशी अनेक पालकांची इच्छा असते. अनेक पालकांनी आपल्या मुलांना खाजगी शाळेतून या शाळेत दाखल केले आहे. २००७ मध्ये केवळ ३० विद्यार्थ्यांची हजेरी असलेल्या या शाळेत आता ४५० हुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे या शाळेतील शारीरिक शिक्षक संगणगौड हचडद यांनी सांगितले.

इंडी तालुक्यातील या सरकारी माध्यमिक शाळेची ख्याती मोठी असून या शाळेच्या उपक्रमाचेही अनेक भागात कौतुक केले जाते. केवळ शिक्षणाचे धोरण न ठेवता विद्यार्थ्यांच्या परिपूर्णतेसाठी आणि शिक्षण घेताना त्यांना योग्य वातावरण मिळावे यासाठी शाळा कमिटी आणि शिक्षकांनी घेतलेले परिश्रम हे अत्यंत कौतुकास्पद आहेत. इतर सरकारी शाळांनी देखील या शाळेचा आदर्श घेऊन अशा पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.