Belagavi

रमेश कुडची यांची काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’

Share

बेळगावचे माजी आमदार रमेश कुडची यांनी रविवारी रायबागमध्ये काँग्रेसच्या मेळाव्यात ‘घरवापसी’ केली.

विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांच्या प्रचारासाठी रविवारी रायबाग येथे काँग्रेसने मेळावा घेतला. यावेळी बेळगावातून दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या व बेळगावचे माजी महापौर असलेल्या रमेश कुडची जेडीएसला सोडचिठ्ठी देत काँग्रेमध्ये घरवापसी केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी रमेश कुडची यांचे शाल घालून पक्षात स्वागत केले. महाराष्ट्र एकीकरण समितीतून  राजकारणात प्रवेश करून नगरसेवक आणि बेळगावचे महापौरपद रमेश कुडची यांनी भूषविले होते. त्यानंतर त्यांनी म. ए. समितीच्या उमेदवाराचा पराभव करत काँग्रेसमधून सलग दोनवेळा आमदारपद मिळवले होते. त्यानंतर तिसऱ्यांदा काँग्रेसमधून तिकीट न मिळाल्याने त्यांनी जेडीएसमध्ये प्रवेश केला होता. आता अचानक यू टर्न घेत त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.