Vijayapura

पावसाने पाण्याच्या प्रवाहात मोटरसायकल गेली वाहून

Share

विजापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार अवकाळी पावसामुळे रस्त्यांना नदीनाल्याचे स्वरूप आले आहे. त्यातच एक मोटरसायकल वाहून गेल्याची घटना घडली.

विजापूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील होनवाड गावात मुसळधार अवकाळी पावसाने रस्त्यांवर नदी-नाल्यांप्रमाणे पाणी वाहून जात आहे. पावसाच्या थैमानामुळे लोक हैराण झाले आहेत. पावसाचे पाणी शेत-शिवारात आणि रस्त्यांवरही साचून वाहात आहे. होनवाड गावात अशाच एका पाण्याच्या प्रवाहात एक मोटरसायकल वाहून गेली.