Banglore

आनेकल येथे भाजपचे विजय संकल्प संमेलन

Share

स्थानिक स्वराज संस्था मतदार संघातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज आनेकल येथे विजय संकल्प संमेलन घेतले.

विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपतर्फे आज आनेकल येथे विजय संकल्प संमेलन घेण्यात आले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या संमेलनाला संबोधित करताना भाजप सरकारने केलेल्या विकासकामांचा दाखला देत भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी महसूल मंत्री आर. अशोक, नगरविकासमंत्री भैरत्ती बसवराज, केंद्रीय मंत्री नारायणस्वामी, खा. तेजस्वी सूर्या, आ. सतीश रेड्डी, कृष्णप्पा, भाजप उमेदवार गोपीनाथ रेड्डी आदी उपस्थित होते.