Vijayapura

अमोघ सिद्धेश्वराचे यात्रा साधेपणाने सुरु

Share

 कर्नाटकमहाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या अमोघ सिद्धेश्वर यात्रा साधेपणाने साजरी करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार यात्रा सुरु झाली आहे

उत्तर कर्नाटकातील भंडाऱ्याची एक प्रमुख यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजापूर जिल्ह्यातील जालगेरेतील अमोघ सिद्धेश्वराची यात्रा कोविडच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरी करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधांनुसार देवस्थानातच पारंपरिक विधी करण्यात आले. महाराष्ट्रातूनही हजारो भाविक यात्रेला येतात. पण सीमेवर त्यांची तपासणी सुरु केल्याने त्यांनी यात्रेस येण्याचे टाळले आहे. एरव्ही किमान ५ लाख भाविक या यात्रेला जमतात.

पण यंदा केवळ सुमारे १० हजार भाविक दाखल झाले आहेत. कोविड मार्गसूचीचे पालन करण्याची सूचना करूनही भाविकांनी मास्क, सामाजिक अंतराचे नियम मोडल्याचे दिसून आले. मात्र आधीच्या यंत्रांच्या तुलनेत यंदा भाविकांची संख्या लक्षणीयरीत्या घेतली आहे. याआधी मार्गशीष अमावास्येला आलेले भाविक ५ दिवस देवस्थान परिसरातच राहत. मात्र यंदा देवस्थान मंडळाने राहण्या-जेवणाची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे दर्शन घेतल्यावर आपापल्या गावी परतण्याकडे भाविकांचा कल दिसून येत आहे. कोरोनाच्या नव्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदा अमोघ सिद्धेश्वराचे यात्रा साधेपणाने साजरी करण्यात येत आहे.