Chikkodi

विजयपूर – जीवर्गी या राज्यमहामार्गावरील रस्त्याची अवस्था खड्डेमय!

Share

अंकलीपासून चिकोडीला जाणाऱ्या विजयपूर – जीवर्गी या राज्यमहामार्गावरील सिंधूर ढाबा आणि रुपिनाळ जवळील रस्त्याच्या मधोमध दीड फूट खड्डे पडल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला असून या मार्गावरून मार्गस्थ होताना प्रत्येकाला आपला जीव मुठीत धरून जावे लागत आहे.

चिकोडी-अंकली मार्ग संपूर्णपणे उखडला आहे. यामुळे या रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. खड्डे चुकवण्याचा प्रयत्नात असणाऱ्या अनेक वाहनधारकांना अपघाताचा सामना करावा लागला आहे. या अपघातामध्ये अनेकजण जखमीही झाले आहेत. सध्या साखर कारखान्यांचा हंगाम सुरु असून या रस्त्यावरून शेकडो ट्रक, ट्रॅक्टर, लॉरीची वर्दळ असते. अशातच रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून मार्गस्थ व्हावे लागत आहे.

या रस्त्याच्या दुरवस्थेविषयी नागरिक वैतागले असून सार्वजनिक बांधकाम खात्यावर आणि प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आहेत. शेकडो वाहनांचा संचार असणाऱ्या या रस्त्याच्या अशा अवस्थेबाबत अद्याप कोणत्याच अधिकाऱ्याचे लक्ष जात नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. (बाईट)

निवडणुकीच्या तोंडावर अनेक आमिषे आणि आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात नागरिक संताप व्यक्त करत असून तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी नागरिक करताना दिसत आहेत.