Banglore

मुख्यमंत्र्यांची केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज दिल्लीत केंद्रीय जलसंसाधन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन राज्यातील पाणी योजनांसंदर्भात महत्वपूर्ण चर्चा केली.

गुरुवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राजधानी दिल्लीत केंद्रीय जलसंसाधन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन विविध मुद्यांवर चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री बोम्मई यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुखलाल मांडवीय यांची भेट घेऊन चर्चा केली. कोरोना लसीकरण, बूस्टर डोस आदी मुद्यांवर उभयतांत चर्चा करण्यात आली. यावेळी खा. शिवकुमार उदासी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, आप्त सचिव अनिलकुमार उपस्थित होते.