Belagavi

कमिशन मिळविणाऱ्या सरकारला मतदार धडा शिकवतील : ऐवान डिसोझा

Share

१० डिसेंबर रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांना प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करा, असे आवाहन एआयसीसी सचिव ऐवान डिसोझा यांनी केले आहे.

मंगळवारी कागवाड तालुक्यातील उगार खुर्द गावातील माजी आमदार राजू कागे यांच्या निवासस्थानी भेट देऊन ऐवान डिसोझा यांनी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. (फ्लो)

ऐवान डिसोझा पुढे म्हणाले कि, जिल्ह्यातील काँग्रेसचे ५१% मतदार प्रथम पसंतीचे मतदान करतील. आमचा विजय निश्चित असून सोन्याचे आणि पैशांचे आमिष दाखविणाऱ्यांना मतदार चांगलाच धडा शिकवतील. बसवराज बोम्मई आणि इतर विभागातर्फे देण्यात आलेल्या अनुदानातून ४० टक्के कमिशन मागितल्याचा आरोप करत एका कंत्राटदाराने पंतप्रधानांना पत्र लिहिले असून या प्रकरणात आपला बचाव करण्याची विनंती सदर कंत्राटदाराने केली आहे. अशा भ्रष्टाचारी सरकारच्या हातून विकास कसा होईल? असा सवाल त्यांनी केला. सिध्दरामय्यांचे सरकार असताना नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर आले होते. यावेळी हे सरकार १० टक्क्यांचे सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र आता त्यांच्याच सरकारच्या काळात एका कंत्राटदाराने ४० टक्के कमिशन मागत असल्याचे पत्रात नमूद केले आहे. यावर पंतप्रधानांचे काय उत्तर आहे? असा सवाल देखील ऐवान डिसोझा यांनी उपस्थित केलाय. (बाईट)

ग्रामपंचायती सुदृढ बनवायच्या असतील तर चन्नराज हट्टीहोळी यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहनही ऐवान डिसोझा यांनी केले असून काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी पहिल्या फेरीत पहिल्या सर्वोत्तम मतांनी विजयी होतील आणि भाजप आणि अपक्ष उमेदवारांमध्येच लढत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच केपीसीसी अध्यक्ष डी.के. शिवकुमार ५ तारखेला चिकोडी येथे येणार असल्याची माहितीही ऐवान डिसोझा यांनी दिली.

यावेळी माजी आमदार राजू कागे, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हा प्रधान सचिव एच. एस. नसलापुरे, ब्लॉक अध्यक्ष विजयकुमार अकिवाटे, ओमप्रकाश पाटील, चंद्रकांत इम्मडी, जिल्हा प्रधान सचिव राजा सलीम काशीमनावर, कुमार पाटील आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.