Belagavi

ओमीक्रॉन’चा धसका! कर्नाटकाच्या सीमेवर आरटीपीसीआर निगेटिव्ह असणे अनिवार्य! वरिष्ठ पोलीस अधीक्षक अमरनाथ रेड्डी यांची माहिती

Share

कर्नाटक सरकारच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र आणि केरळ या राज्यातून कर्नाटकात प्रवेश घेणाऱ्या नागरिकांसाठी ७२ तासांच्या आतील आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असणे अनिवार्य असून सदर रिपोर्ट नसल्यास सीमेवरूनच नागरिकांना परत पाठविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा वरिष्ठ पोलीस अधीक्षक अमरनाथ रेड्डी यांनी दिली आहे.

सोमवारी सायंकाळी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या कागवाड परिसरातील चेकपोस्टला त्यांनी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हि माहिती दिली आहे. कोविड च्या दोन्ही लसींचे डोस होण्यासहीत महाराष्टातून आणि केरळमधून येणाऱ्या नागरिकांसाठी ७२ तासांच्या आतील आरटीपीसीआर रिपोर्ट अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही अटी पूर्ण होत असतील तरच नागरिकांना कर्नाटाकात प्रवेश देण्यात येत आहे, असे रेड्डी म्हणाले.

कोरोनाच्या नव्या ओमीक्रॉन या विषाणूचा फैलाव होत असल्याची माहिती उपलब्ध होत असून यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने हा आदेश कटाक्षाने पाळण्यासंदर्भात सूचना केली आहे. या दोन दिवसात सीमावर्ती भागातील सर्व चेकपोस्टवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून तपासणीसाठी कर्मचारी तैनात करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिण्यात आले असून आरोग्य विभाग, महसूल विभाग आणि वरिष्ठ पोलीस विभाग, होम गार्डस यांच्या नेमणुकीबद्दल विनंती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

विजापूरमध्ये वाढत चाललेल्या चोरीच्या प्रकरणासंदर्भात बोलताना अमरनाथ रेड्डी म्हणाले, गेल्या काही कालावधीमध्ये चोरी करण्यात आलेल्या वस्तू संबंधित मालकांना परत देण्यात आल्या आहेत. पोलीस विभागाची चोरांवर करडी नजर असून विशेष पथकाची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (बाईट)

यावेळी अथणी डीवायएसपी एस. व्ही. गिरीश, सीपीआय शंकरगौडा बसनगौडर, कागवाड पीएसआय बी. एम. रबकवी आदी उपस्थित होते.