Belagavi

बेळगाव जिल्ह्यातील सीमांवर हाय अलर्ट !

Share

कोविडचा नवा रूपांतरित विषाणू ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार बेळगाव जिल्ह्यातील सीमांवर हाय अलर्ट पाळण्यात येत असून महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांवर कडक निगराणी ठेवण्यात येत आहे

व्हॉईस ओव्हर : बेळगाव-महाराष्ट्र सीमेवरील बाची चेक पोस्टवर सध्या हाय करत देण्यात आला आहे. या चेक पोस्टवर महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. त्याशिवाय कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट बाळगणे बंधनकारक केले आहे.

बाचीसह बेळगाव जिल्ह्यातील अन्य चेक पोस्टवरसुद्धा अशीच दक्षता घेण्यात येत असून महाराष्ट्रातून येणारी वाहने अडवून प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे.