Banglore

राष्ट्रीय बौद्ध परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Share

देशासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शांततेचा संदेश देत संविधानाची रचना केली. घटनेत प्रत्येकाच्या अधिकाराबाबत संदेश देऊन त्यांनी आपले ज्ञान आणि तत्वे जगासमोर मांडली.आंबेडकर हे एक म्हण तत्वज्ञ होत असे उदगार कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काढले. राष्ट्रीय बौद्ध परिषदेच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.

बेंगळूर सदाशिवनगर येथील नागसेना विद्यालयात ७२ व्या संविधान दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय बौद्ध धर्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर उपस्थितांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, भारत हि पुण्यभूमी आहे असे बुद्धांनी म्हटले आहे. भारतात अनेक मूलभूत बदल घडले असून भारताचा नावलौकिक आणि वैंद्यानिक दृष्ट्याही अनेक बदल घडले असल्याचे ते म्हणाले.

समाजातील अस्पृश्यता कायमची दूर व्हावी, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले. जर बाबासाहेबानी घटनेची निर्मिती केली नसती तर देश डळमळाला असता. समाजात भेदभाव निर्माण झाले असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दुसरे बुद्धच आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, तलवारीपेक्षाही अधिक ताकद बाबासाहेबांच्या लेखणीत आहे. समानता, अभिव्यक्ती स्वातंत्र यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलेल्या गोष्टी या कौतुकास्पद आहेत.

या कार्यक्रमाला डॉ. एम. वेंकटस्वामी, भाजप नेते छलवादी नारायणस्वामी आदींसह विविध मठाधीश उपस्थित होते.