Vijayapura

राजकारणी हेच खरे गुंड आणि भ्रष्टाचारी श्रीरामसेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांचा आरोप

Share

निवडणूक जवळ आल्या कि हिंदूंचे राजकारण करण्याची सवय लागली असून हिंदूंच्या नावावर आंदोलने करणाऱ्यांवर रावडीशीटर प्रकरणे दाखल करा, हिंदूंचा वापर आपल्या स्वार्थासाठी करणारे राजकारणी हेच खरे गुंड आहेत, आणि भ्रष्टाचारी आहेत, असा आरोप श्रीरामसेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी केलाय.

विजापूर येथील श्री संगबसव कल्याण मंटपात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील विविध अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर एसीबीने घातलेल्या धाडीसंदर्भात प्रतिक्रिया देताना ते म्हणाले कि, अशा अधिकाऱ्यांच्या मागे राजकारणी असतात. त्यांना बाहेर काढले पाहिजे. बाहेरच्या जगात चाकू, बंदुकीच्या धाकाने लूट करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांचा वापर करून राजकारणी भ्रष्टाचार करत असल्याचा आरोपही प्रमोद मुतालिक यांनी केला.

अभिनेता चेतन हंसलेख यांनी केलेल्या उडुपी पेजवर श्रींच्या संदर्भातील वक्तव्यावर बोलताना प्रमोद मुतालिक म्हणाले, हंसलेख हे एक मोठे व्यक्तिमत्व आहे. अशापद्धतीने वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्यांच्या त्या वक्तव्याचा मी निषेध करत आहे. त्यांनी आपल्या विधानाबाबत माफी मागितली आहे परंतु त्यांची माफी मागण्याची पात्रता नसल्याचे मत मुतालिक यांनी व्यक्त केले. तसेच हंसलेख यांचे दलितांसाठी काय योगदान आहे? असा सवाल देखील मुतालिक यांनी उपस्थित केला.

शामनूर शिवशंकरप्पा यांनी धर्मांतरितांना परत आणण्यासाठी समाजाला पत्र लिहिले आहे. त्याचे आपण स्वागत करतो. धर्मांतरितांना परत आणण्यासाठी आपण काम केले पाहिजे. तसेच रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत माईक वापरण्याची परवानगी देण्यात आली नसून यासंदर्भातील आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. परंतु तरीही पहाटे पाच वाजता माइकवरून नमाज सुरु होतो. हे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

आगामी निवडणुका, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून होत असलेले राजकारण आणि धर्मांतरासंदर्भात होत असलेल्या हालचालींवर आज प्रमोद मुतालिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भातील आपले विचार पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केले आहेत.