Banglore

मेट्रो कास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा बेंगळुरात कार्यारंभ 

Share

मेट्रो कास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या कंट्रोल रूमचे गुरुवारी  मेट्रोसिटी बेंगळूरमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते उदघाटन झाले.

होय, राजधानी बेंगळूरमधील माधव नगरातील यमुनाबाई रोड, चौथा मजला, केसीएन भवन या कार्यालयात स्थापन केलेल्या कंट्रोल रूमचे गुरुवारी शानदार समारंभात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी फीत कापून उदघाटन केले. यावेळी मेट्रो कास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमोटर व मॅनेजिंग डायरेक्टर नागेश नारायणदास छाब्रिया, प्रमोटर निशा नागेश छाब्रिया, सुमुख नागेश छाब्रिया, सौ. रिद्धी आणि श्री. आदित्य असरानी, इन न्यूजचे प्रधान संपादक राजशेखर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मेट्रो कास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे गेल्या २५ वर्षांपासून उत्तर कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा येथे केबल टीव्ही आणि ब्रॉडबँड सेवा देत आहे. या निरंतर यशस्वी सेवेनंतर कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि पश्चिम बंगाल या राज्यांत सेवेचा विस्तार केला आहे. यातून कंपनीकडे केबल टीव्ही आणि ब्रॉडबँडचे १० लाखांहून अधिक ग्राहक आहेत. गेल्या २० वर्षांपासून उत्तर कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, बागलकोट, बीदर, हुबळी-धारवाड, हावेरी, रायचूर, दावणगेरी, भागशः बळ्ळारीसह गोवा राज्यातील अनेक भागात बेळगाव कार्यालयातून ‘इन न्यूज’ चॅनेलद्वारे कन्नड, मराठी आणि हिंदी भाषांतील राज्यात सर्वप्रथम स्थानिक बातम्या प्रसारित करणारे एकमेव चॅनेल ठरले आहे हे सांगण्यास आम्हास अभिमान वाटतो.

आता मेट्रो कास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या बेंगळूर येथील कार्यालयातून उच्च दर्जाची टीव्ही चॅनेल प्रसारण सेवा देण्यासह ओटीटी, आयपीटीव्ही सेवा देण्याच्या दृष्टीने १ हजार चॅनेल्सचा सेटअप असलेली कंट्रोल रुम कार्यालय स्थापन करून उत्तम सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या दृष्टीने ७०० चॅनेल्स त्वरित सुरु करण्यात येणार आहेत. इतकेच नाही तर उत्तर कर्नाटकातील केबलसेवा संस्थेकडून राजधानी बेंगळूरमध्ये सर्वप्रथम कंट्रोल रूम स्थापन करण्याचा मानही आमच्या संस्थेने मिळवला आहे. यासह आम्ही डिजिटल ब्रॅंडिंग सेवाही देत असून, ऑनलाईनमध्ये ब्रँड विकसित करण्यासह डिजिटल मार्केटिंग आणि इंटरनेट ब्रॅंडिंगचे संयोजन केले आहे.