Belagavi

बेळगावात श्री चिदंबरेश्वर जन्मोत्सवाला प्रारंभ

Share

 बेळगावात श्री चिदंबरेश्वर जन्मोत्सवाला विविध धार्मिक कार्यक्रमांनी गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला.

होय, बेळगावातील चिदंबर नगरातील चिदंबरेश्वर मंदिरात गुरुवारी पहाटे काकडारतीने श्री चिदंबरेश्वर जन्मोत्सवाला भक्तिभावाने उत्साहात प्रारंभ झाला. त्यानंतर लघु रुद्राभिषेक, देवता अलंकार, ललिता सहस्त्र नामावली पठण, सुवासिनींकडून कुंकुमार्चन, जन्मोत्सव कीर्तन आणि नामकरण-पाळणा आदी धार्मिक विधी करण्यात आले. असंख्य भक्तांनी मंदिरात येऊन चिदंबरेश्वराचे दर्शन घेतले.

यासंदर्भात माहिती देताना मंदिराचे संचालक आनंद पाटील म्हणाले, श्री चिदंबरेश्वर जन्मोत्सवानिमित्त मंदिरात ३ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आज पहाटेपासून रुद्राभिषेक, महिलांकडून कुंकुमार्चन आदी कार्यक्रम पार पडले आहेत. भक्तांना महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले आहे. उद्याही मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून, भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान श्री चिदंबरेश्वर जन्मोत्सवानिमित्त उद्या, शुक्रवारीही काकडारती, लघु रुद्राभिषेक, श्री सत्य चिदंबरेश्वर पूजा तसेच सायंकाळी कार्तिकोत्सव, मंत्रपुष्पांजली आदी कार्यक्रम होणार आहेत.