Belagavi

गडीनाडू हितरक्षण वेदिकेच्या तालुकाध्यक्षांची निवड

Share

कर्नाटक राज्य गडीनाडू हितरक्षण वेदिकेच्या बैलहोंगल आणि कित्तूर तालुकाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे

बैलहोंगल तालुकाध्यक्षपदी यासिन कित्तूर यांची तर कित्तूर तालुकाध्यक्षपदी राजू जांगटी यांची निवड करण्यात आली. या दोघांनी कित्तूर येथील राणी चन्नम्मा पुतळ्यासमोर पदभार स्वीकारला. यावेळी बोलताना वेदिकेचे राज्य सरचिटणीस एम. एम. राजीभाई म्हणाले, गडीनाडू हितरक्षण वेदिकेकडून कन्नड भाषा, संस्कृतीच्या रक्षणासाठी कार्य केले जात आहे.

यावेळी त्यांनी मुंबई-कर्नाटक भागाचे कित्तूर-कर्नाटक असे नामकरण केल्याबद्दल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे अभिनंदन केले. बाईट यावेळी राज्य सचिव भीमाप्पा बोकडेकर, पदाधिकारी कल्लाप्पा अगसीमनी, जहीरअब्बास बेपारी, बसवराज कडेमनी आदी उपस्थित होते.