Khanapur

काव्यमैफलीच्या माध्यमातून भाषिक सौहार्द वाढविण्याचा यशस्वी प्रयोग

Share

काव्यमैफलीच्या माध्यमातून भाषिक सौहार्द वाढविण्याचा यशस्वी प्रयोग खानापूर तालुक्यातील माचिगड येथे करण्यात आला. यावेळी नंदगडचे सीपीआय सतीश माळगोंड यांनी भाषिक सौहार्दावर आधारित स्वरचित कन्नड कविता सादर करून सर्वांचे मन जिंकले.

होय, बेळगाव सीमाभागात पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करून साहित्य संमेलनांचा पायंडा पाडणाऱ्या माचिगडवासियांनी भाषिक सौहार्द निर्मितीसाठी बहुभाषक काव्यमैफल आयोजित करून आणखी एक प्रशंसनीय पायंडा पाडला आहे. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त माचिगडात कन्नड व मराठी भाषा बांधवांनी भाषा सौहार्द दिन साजरा केला. यासाठी धारवाडहुन कन्नड कवींना तर खानापूर तालुक्यातील मराठी कवींना निमंत्रित करण्यात आले होते. या कवींनी भाषिक सौहार्दावर आधारित स्वरचित कविता सादर केल्या. त्याचप्रमाणे भाषिक सौहार्दावर आधारित वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यातून सीमाभागात भाषिक सौहार्दाने कसे जगावे हा संदेश देण्यात आला.

यावेळी बोलताना नंदगडचे सीपीआय सतीश माळगोंड यांनी भाषिक सौहार्दावर आधारित स्वरचित कन्नड कविता सादर करून सर्वांचे मन जिंकले. बाईट

एकंदर ग्रामस्थांमध्ये भाषिक सौहार्दाचे बीज पेरण्यात हा उपक्रम यशस्वी ठरला. यावेळी माचिगड व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.