Hukkeri

काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींचा हुक्केरी शहरात मेळावा

Share

हुक्केरी शहरात स्थानिक स्वराज संस्थांच्या काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींचा मेळावा घेण्यात आला.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हुक्केरी येथील रवदी फार्म हाऊसमध्ये हुक्केरी तालुक्यातील काँग्रेसच्या ग्राम पंचायत सदस्यांचा तसेच हुक्केरी व संकेश्वर नगरपंचायतींच्या सदस्यांचा मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री ए. बी. पाटील होते. मेळाव्याचे उदघाटन केपीसी

मेळाव्याला संबोधित करताना बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, माझे बंधू चन्नराज हट्टीहोळी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून विधान परिषद निवडणूक लढवीत आहेत. त्यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन निवडून देऊन तुमची सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन केले.

यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, काँग्रेस चिक्कोडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, काँग्रेस नेते डॉ. जयप्रकाश करजगी, अशोक अंकलगी, संतोष मुडशी, महेश हट्टीहोळी, विजय रवदी आदी उपस्थित होते. यावेळी मतदारांना आवाहन करताना उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांनी, २०२३च्या आगामी विधानसभा निवडणुकीत ए. बी. पाटील आणि सतीश जारकीहोळी यांचे हात बळकट करण्यासाठी या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार असलेल्या मला निवडून द्या असे आवाहन केले.

त्यानंतर जेडीएसचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या बसवराज पाटील आणि प्रकाश मैलाखे यांचा पक्षध्वज देऊन पाकीस्तात प्रवेश देण्यात आला. मेळाव्यात बोलताना आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, पक्षाचा अजेंडा समोर ठेवून प्रचार करत आहोत. मतदारांनी विरोधी पक्षांनी पसरवलेल्या अफवा-कंड्याना बळी न पडता पक्षाचे अधिकृत उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांनाच पहिल्या पसंतीचे मत देऊन निवडून द्यावे असे आवाहन केले.

यावेळी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाध्यक्ष शानूल ताशिलदार, सचिव राजू सिदनाळ, मृणाल हेब्बाळकर, किरण करोशी, संतोष देशपांडे, पंकजा नेर्ली, नम्रता वैरागी, दिलीप होसमनी तसेच हुक्केरी विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत आणि हुक्केरी व संकेश्वर नगरपंचायतीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.