hubali

‘अमृत अपार्टमेंट्स’ : शहरी जीवनावर आधारित कन्नड चित्रपट

Share

जी-९ कम्युनिकेशन्स मीडिया अँड एंटरटेनमेंट निर्मित ‘अमृत अपार्टमेंट्स’ हा चित्रपट संपूर्ण राज्यभरात २६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे, अशी माहिती साहित्यिक श्यामसुंदर बिदरकुंदी यांनी दिली आहे.

हुबळी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘अमृत अपार्टमेंट्स’ हा चित्रपट शहरी जीवनावर आधारित असून आधुनिक जीवनशैलीत होत असलेल्या भावनिक बदलांचे, नातेसंबंधांचे चित्रण या चित्रपटाच्या माध्यमातून दर्शविण्यात येणार आहे. गुरुराज कुलकर्णी यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला हा चित्रपट तारक पोन्नप्पा, बालाजी मनोहर, संपतकुमार, सीता कोटी, मानस जोशी, उर्वशी गोवर्धन आणि इतर कलाकारांच्या अभिनयाने नटला आहे.

चित्रपटाचे चित्रीकरण बंगळूरमध्ये करण्यात आले असून या चित्रपट दोन गाणी देखील चित्रित करण्यात आली आहेत. अभिनेत्री मानस जोशी हि या चित्रपटात पोलिसांची व्यक्तिरेखा साकारत असून तारक पोन्नप्पा प्रमुख भूमिका साकारत आहे. शहरी भागात राहणाऱ्या एका मध्यमवयीन जोडप्याची हि कहाणी असल्याचे श्यामसुंदर बिदरकुंदी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राज निसासं, मालटेश, कृष्ण अरवळ्ळी आदी उपस्थित होते.