Vijayapura

मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी पित्याने केले सामूहिक विवाहाचे आयोजन

Share

बसवनाड येथील आमदारांनी मुलीची इच्छेसाठी १०१ सामूहिक विवाहाचे आयोजन केले आहे. विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी मतदार संघातील काँग्रेसचे आमदार आणि माजी आरोग्यमंत्री, डीसीसी बँकेचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी आपल्या मुलीची इच्छेसाठी तिच्या विवाहानंतर सामूहिक विवाहाचे आयोजन केले आहे.

विजापूर शहरात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता गोरज मुहूर्तावर शहरातील ऐतिहासिक बेगम तलाव मैदानात त्यांच्या मुलीच्या विवाह समारंभाचे आयोजन केले आहे. त्यांची कन्या संयुक्त हिची इच्छा होती कि आपल्या विवाहादरम्यान सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात यावे. परंतु कोरोना परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. आमदार शिवानंद पाटील यांनी सदर माहिती पत्रकार परिषदेत दिली असून कोरोना पार्श्वभूमीवर साधेपणात विवाह सोहळा पार पाडण्यात येणार आहे. . यावेळी सामूहिक विवाह करणे शक्य नाही. लवकरच डीसीसी बँकेला १०१ वर्षे पूर्ण होत असून बँकेच्या शतकमहोत्सवाचे औचित्य साधून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला संयुक्त पाटील देखील उपस्थित होत्या.