Belagavi

मलप्रभा साखर कारखान्यात अफरातफर : शेतकऱ्यांचा आरोप

Share

एम. के. हुबळी येथील मलप्रभा साखर कारखान्यात झालेल्या अफ़रातफ़रीचा निषेध करत कर्नाटक राज्य शेतकरी संघ, हसीरू सेना आणि भागधारकांनी अहोरात्र धरणे आंदोलन सुरु केले आहे.

मलप्रभा साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी संजीवनी होती. यावर शेतकऱ्यांची उपजीविका सुरु होती. मात्र आता हाच कारखाना शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर बिल मिळत नाही, आणि साखरेच्या साठ्यासंदर्भात चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. २०१७-१८ शाळातील ७ कोटी ८० लाख रुपयांचे बिल थकीत आहे. आतापर्यंत केंद्र सरकारकडून ५ कोटी २० लाख रुपये आले आहेत. हे पैसे शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. परंतु कारखान्याच्या प्रशासन मंडळाने हि रक्कम इतर गोष्टींसाठी वापरली आहे, यासंदर्भात शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कर्नाटक राज्य शेतकरी संघ आणि हसीरू सेनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी रात्रीपासून अधोरात्र धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे.

व्हॉइस : यासंदर्भात माहिती देताना शेतकरी नेत्या जयश्री गुरन्नावर म्हणाल्या, केवळ १३९ क्विंटल साखर आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. गोडाऊनमध्ये २० हजार क्विंटलहून अधिक साखर आहे. १३८०० क्विंटल साखरेवर कर्ज घेण्यात आले आहे. तसेच कारखान्याच्या प्रशासकांकडून मागासवर्गीय समाजाच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज घेतले आहे, असा आरोप त्यांनी केला.

या आंदोलनात बोगुर, दास्तीकोप्प ग्राम पंचायतीचे अध्यक्ष उमेश सिद्रामणी, आप्पाण्णा कोत्तलमनी, सुनील तिप्पण्णावर, अदृश्यप्पा कळसन्नवर, प्रकाश नाईक, दोडगौड हुच्चगौडर, रुद्राप्पा कोडली, आनंद हुच्चगौडर, गणेश इळीगेर, गुरु गाणिगेर, सत्याप्पा मल्लपुरे आदींसह इतर शेतकरी उपस्थित होते.