Belagavi

कोनेवाडी गावची युवती बेपत्ता

Share

कपडे खरेदीसाठी म्हणून बेळगावला आलेली कोनेवाडी गावची युवती बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.

बेळगाव तालुक्यातील कोनेवाडी येथील कोनेनाथ गल्लीतील १९ वर्षीय युवती ऐश्वर्या अशोक भातकांडे ही  बेपत्ता झाली आहे. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १ च्या सुमारास बेळगावला जाऊन कडपें खरेदी करून येते म्हणून ती घराबाहेर पडली होती. ती परत आली नाही. याबाबत तिचे वडील अशोक गुंडू भातकांडे यांनी काकती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ऐश्वर्या ५.२ उंच आहे. सदृढ बांधा, उभट चेहरा, गहूवर्णीय व लांब नाकाची आहे. घरातून बाहेर पडताना तिने निळ्या रंगाचा फुलांच्या डिझाईनचा टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केली आहे. तिने आयटीआय पर्यंत शिक्षण घेतले असून मराठी भाषा बोलते. या वर्णनाच्या युवतींबद्दल माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन काकती पोलिसांनी केले आहे.