Hukkeri

वासिम रिझवी यांच्या अटकेसाठी हुक्केरीमध्ये आंदोलन

Share

उत्तर प्रदेश येथील वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वासिम रिझवी यांच्या अटकेची मागणी करत हुक्केरी शहरात आंदोलन छेडण्यात आले.

शनिवारी हुक्केरी येथे छेडलेल्या आंदोलनात विविध मुस्लिम संघटनांचे नेते सहभागी झाले होते. यावेळी वसीम रिझवी यांच्या अटकेची मागणी करत ग्रेड – २ तहसीलदार किरण बेळवी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले.

हुक्केरी तालुक्यातील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तहादल मुस्लिम कमिटीचे अध्यक्ष अल्लमुद्दीन गळतगी आणि सर्फराज खानजादे यावेळी बोलताना म्हणाले, उत्तर प्रदेशातील शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वासिम रिझवी यांनी आपल्या ग्रंथात प्रेषित महंमद पैगंबर यांच्याविरोधात अपशब्द वापरले आहेत. त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी आपण करत आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

या आंदोलनात मोशीन मुजावर, बंदेनवाज मुजावर, रमजान मुजावर, आसिफ मुल्ला, सद्दाम मुल्ला, वाशीम नदाफ, यासिन कलादगी आदींनी सहभाग घेतला होता.