Dharwad

मुमिगट्टी येथील शेतकऱ्यांची जोरदार निदर्शने

Share

आपली संपादित जमीन वेगळ्याच उद्देशासाठी वापरली जात असल्याच्या निषेधार्थ धारवाड जिल्ह्यातील मुमिगट्टी येथील शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शने करून विरोध व्यक्त केला.

केआयएडीबी अर्थात कर्नाटक औद्यागिक वसाहत विकास महामंडळाने १९९४-९५ मध्ये धारवाड जिल्ह्यातील मुमिगट्टी येथील २४१ एकर जमीन संपादित केली होती. या अधिग्रहित जमिनीवर उद्योजक आणि कामगारांसाठी वसतिगृहे निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगून जमीन घेण्यात आली होती. मात्र आता यातील १३० एकर जमीन प्रभावी व्यक्तींना देण्यात आली आहे. ३४ एकर जमीन प्रकल्प हॉटेल आणि इस्पितळ तसेच राष्ट्रोत्थान परिषद संस्थेला दिली आहे असा आरोप निदर्शक शेतकऱ्यांनी केला.

या जमिनीचे अधिग्रहण केल्यावर शेतकऱ्यांना भरपाईही योग्य प्रमाणात दिलेली नाही. जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. ते ही पाळण्यात आलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी करून शेतकऱ्यांनी निदर्शने केली. यावेळी केआयएडीबी अधिकाऱ्यांच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या.