Agriculture

शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच बायपास करावा : आ. सतीश जारकीहोळी

Share

शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच जिल्हाधिकाऱ्यांनी हलगामच्छे बायपास रस्त्याचे काम करायला हवे अशी प्रतिक्रिया केपीसीसी कार्याध्यक्ष . सतीश जारकीहोळी यांनी दिली

होय, हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांनी प्रखर विरोध करूनही जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पोलीस बंदोबस्तात हे काम सुरूच ठेवले आहे. त्याला शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शने करत विरोध केला आहे. काही शेतकऱ्यांनी तर याच्या विरोधात आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यामुळे संपूर्ण कर्नाटकात हे प्रकरण गाजत आहे. बुधवारी या संदर्भात बेळगावातील कुवेम्पू नगरातील केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी जिल्हा प्रशासनाकडून आपल्यावर दडपशाही व अन्याय झाल्याची कैफियत मांडली.

यावेळी बोलताना आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांची बैठक घेतली पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हे काम करायला हवे. जमिनीची किंमत पाचपट करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. सामंजस्याने हा प्रश्न सोडविला पाहिजे. याप्रश्नी सर्वपक्षीय बैठक बोलावल्यास आम्ही सल्ला-सूचना देऊ असे ते म्हणाले.

दरम्यान, आ. सतीश जारकीहोळी यांची सूचना जिल्हा प्रशासन कितपत मनावर घेते हे पहावे लागेल.