Belagavi

विधान परिषदेसाठी काँग्रेस उमेदवार २-३ दिवसात ठरणार : आ. सतीश जारकीहोळी

Share

 विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची यादीसंदर्भात वरिष्ठ नेत्यांची एक बैठक झाली आहे. येत्या दिवसांत निश्चित होईल अशी माहिती केपीसीसी कार्याध्यक्ष . सतीश जारकीहोळी यांनी दिली.

बेळगावात बुधवारी पत्रकारांशी बोलताना केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, प्रकाश हुक्केरी, चन्नराज हट्टीहोळी आणि वीरकुमार पाटील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. जिल्ह्यात लोकप्रिय असलेल्या नेत्याला उमेदवारी देण्याचा प्रयत्न आहे. उमेदवार कोणताही असला तरी निवडणूक जिंकण्याची आमची तयारी आहे. मतदार संघात एकच उमेदवार उभा करण्यात येणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

लखन जारकीहोळी यांना उमेदवारी देण्यासंदर्भात प्रश्नावर बोलताना आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, लखन जारकीहोळी भाजपसोबत गेले आहेत. डिसेंबर २३ नंतर याबाबत चित्र स्पष्ट होईल. विधान परिषदेची १ जागा जिंकण्याइतपत सदस्य मतदार आमच्याकडे आहेत. लखन जारकीहोळी यांनी विधान परिषद निवडणूक लढविल्यास काँग्रेस आणि भाजपमध्ये मतांचे विभाजन होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली.

बेळगाव महानगर पालिका निवडणुकीतील पराभवाला माजी आ. फिरोज सेठ कारणीभूत ठरल्याबाबतच्या व्हिडिओ संदेशाबाबत आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, मी यात कोणाचेही नाव घेतलेले नाही. मला जे दुःख झाले ते व्यक्त केले इतकेच. वरचेवर असे होत राहिले तर पक्षाचे संघटन टिकविणे कठीण होईल. सगळे काही डोळ्यांनी पाहिले आहे, कानांनी ऐकले आहे. पालिका निवडणुकीत आणखी १० जागा जिंकता आल्या असत्या, लोकसभा पोटनिवडणुकीतही अतिरिक्त १० हजार मते मिळू शकली असती. यापुढे असे होऊ नये याची काळजी घेण्याचे आवाहन मी केले आहे. लोकसभा पोटनिवडणुकीत आलेल्या पक्ष निरीक्षकांनीही पक्ष नेत्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे