Belagavi

पुनीत यांना मरणोत्तर ‘कर्नाटक रत्न’ पुरस्कार : मुख्यमंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह

Share

अभिनेता पुनीत राजकुमार यांना मरणोत्तरकर्नाटक रत्नपुरस्कार देण्याचा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर स्वामीजी यांनी दिली आहे.

प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या निधनामुळे कर्नाटकावर शोककळा पसरली आहे. बेंगळुरातील राजवाडा मैदानावर पुनीत नमन कार्यक्रमात पुनीत याना मरणोत्तर ‘कर्नाटक रत्न’ पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पुनीत आज आपल्यात नसतील परंतु त्यांच्या आठवणी कायम असतील. त्यांनी केलेले समाजकार्य आजच्या युवा पिढीला आदर्श आहे. कर्नाटक सरकारने पुनीत याना ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळावा यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा आणि पुनीत यांच्या चाहत्यांना चांगली बातमी द्यावी अशी अपेक्षा चंद्रशेखर स्वामीजी यांनी व्यक्त केली.