Banglore

गोव्यात होणार कन्नड भवनची निर्मिती :मुख्यमंत्री

Share

गोव्यात कन्नड भवन निर्मितीसाठी १० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाल्याची घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली.

बंगळूरमध्ये आज कृष्णा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अखिल गोवा कन्नड महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सदर घोषणा केली आहे. भाजप राष्ट्रीय प्रधान सचिव सिटी रवी यांच्या नेतृत्वाखाली गोवा कन्नड महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले कि, गोवा राज्यात उत्तर कर्नाटक भागातील असंख्य जनता वास्तव्यास आहे. त्यांना बाहेरील राज्यात देखील कन्नड भह वाढवायची आहे. कन्नड संस्कृती जपायची आहे. यासाठी गोवा राज्यात कन्नड भवन निर्मितीसाठी सरकार सरसावले असून यासाठी योग्य जागेचा शोध घेण्यासंदर्भात डीपीआर तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कन्नड भवन निर्मितीसाठी १० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ()

यावेळी गोवा कन्नड महासंघाचे अध्यक्ष हनुमंत रेड्डी शिरूर, पदाधिकारी मल्लिकार्जुन बदामी, महेश बाबू सुर्वे, अरुण कुमार आदींसह इतर सदस्य उपस्थित होते.