Banglore

केंद्रीय मंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांची विकाससौधला भेट

Share

बेंगळूर येथील विकाससौधला आज केंद्रीय ग्रामविकासमंत्री आणि पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील आणि के एस ईश्वरप्पा यांनी भेट देऊन विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी विविध विभागाच्या विकास कामकाजाच्या माहिती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी मंत्र्यांनी चर्चा करून प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी विविध विभागासंदर्भात प्रधान सचिव श्रीमती उमा महादेवन यांनी विस्तृत माहिती दिली.

यावेळी मंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी ग्रामीण भागात महिलांनी विविध स्वसहायय संघाच्या माध्यमातून केलेल्या प्रगतीचे कौतुक करत महिलांचे अभिनंदन केले. कोरोनाकाळात ग्रामीण स्वसहायय संघाच्या माध्यमातून मास्क तयार करणे, सॅनिटायझर तयार करणे तसेच स्वच्छ भारत योजनेंतर्गत हाती घेतलेल्या अनेक विकास कामकाजाचेही त्यांनी कौतुक केले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील क्रीडापटूंचेही त्यांनी अभिनंदन केले. क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी विभागाकडून कोणत्या मदतीची गरज असल्यास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच के एस. ईश्वरप्पा यांचीही प्रशंसा कपिल मोरेश्वर पाटील यांनी केली.

मंत्री के एस ईश्वरप्पा यांच्याहस्ते मंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील महिलांनी बनविलेल्या वस्तू देखील देण्यात आल्या. यानंतर बोलताना ईश्वरप्पा यांनी राज्यातील विकासकामांसंदर्भात आढावा घेऊन माहिती दिली. तसेच विविध कामकाजासंदर्भात केंद्राकडून हव्या असलेल्या सहकार्याचे आवाहनदेखील केले. आगामी काळात कर्नाटकात सर्वाधिक विकास कामे होऊन विकसित राज्याच्या यादीत कर्नाटकाचा पहिला क्रमांक येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रधान सचिव श्रीमती उमा महादेवन, विभाग आयुक्त श्रीमती शिल्पा नाग, विशेषाधिकारी जी. जयराम, तसेच मंत्र्यांचे निकटवर्तीय सचिव सी एन मंजुनाथ, आणि विविध विभागाचे संचालक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.