Chikkodi

सदलगा नगरपरिषदेच्या चौघांचे सदस्यत्व रद्द

Share

 पक्षांतर विरोधी कायद्यान्वये जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी चिक्कोडी तालुक्यातील सदलगा नगरपरिषदेच्या चौघा सदस्यांचे सदस्यत्व रद्द केल्याची माहिती भाजप सदस्य बसवराज हणबर यांनी दिली.

सदलगा विश्रामधामात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बसवराज हणबर म्हणाले, प्रभाग क्र. १२ चे नगरसेवक सुरेश उदगावे, प्रभाग क्र. ५ चे नगरसेवक मेहबूब काळे, प्रभाग क्र. १५ चे नगरसेवक नौशाद मुजावर आणि प्रभाग क्र. ६ चे नगरसेवक सुजाता कुंभार याना सदस्यत्वापासून अपात्र घोषित करून आदेश जारी केला आहे. हे चारही नगरसेवक भाजपच्या उमेदवारीवर निवडून येऊन काँग्रेसमध्ये गेले होते. त्यामुळे भाजप नगरसेवक आनंद पाटील आणि हेमंत शिंगे यांनी साक्षी-पुराव्यांसह त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या नगरसेवकांचा मुखभंग झाला असून भाजपला अधिक बळकटी मिळाली आहे. या कायदेशीर लढाईत मंत्री शशिकला जोल्ले, खा. अण्णासाहेब जोल्ले, माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे, विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, भाजप चिक्कोडी जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली, संजय पाटील, प्रकाश पाटील आदींचे सहकार्य लाभल्याचे बसवराज हणबर यांनी सांगितले. बाईट

पत्रकार परिषदेला आनंद पाटील, अभिनंदन पाटील, अभिषेक पाटील, दरेप्पा हवालदार, चेतन पाटील, अनिरुद्ध पाटील, बाळगौडा पाटील, प्रशांत करंगळे, राजू अमृतसमानावर, चिदानंद कमते, भरत दोरगावे, शिवचंद्र यक्कुन्डे, चिदानंद समगार आदी उपस्थित होते.

 

सदलगा नगरपरिषदेच्या चौघांचे सदस्यत्व रद्द

पक्षांतर विरोधी कायद्यान्वये कारवाई

जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांच्याकडून आदेश जारी