Belagavi

 बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीच्या वतीने रविवारी ‘रोलर स्केटिंग चॅम्पिअनशिप – २०२१’चे बेळगावात आयोजन करण्यात आले.

Share

बेळगावातील केएलई संस्थेच्या लिंगराज कॉलेजच्या मैदानातील स्केटिंग रिंगमध्ये आज ‘रोलर स्केटिंग चॅम्पिअनशिप – २०२१’ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत १२०हुन अधिक स्केटिंगपटूंनी भाग घेतला. स्पर्धेच्या उदघाटन समारंभास रमेश परदेशी, अतुल यलजी, तुकाराम पाटील, चौकसिंग पुरोहित, गणेश दड्डीकर, सूर्यकांत हिंडलगेकर आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगने, अनुषा शंकरगौडा, शुभम साखे, सक्षम जाधव, चिन्मयराज देसाई आदींनी परीश्रम घेतले.

बेळगावात रोलर स्केटिंग चॅम्पिअनशिप