Crime

पाय घसरून तलावात पडल्याने दोघा युवकांचा बुडून मृत्यू

Share

 पाय घसरून तलावात पडल्याने दोघा युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कित्तूर तालुक्यातील एम. के. हुबळी येथे रविवारी घडली.

रविवारी सकाळी एम. के. हुबळी येथील तलावाकडे गेलेल्या दोघं युवकांचा पाय घसरून ते तलावात पडले. पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी अग्निशमन दलाला बोलावून घेत तलावाकडे धाव घेऊन शोधकार्य सुरु करण्यात आले. दोघा युवकांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. २५ वर्षीय कांतेश बडिगेर असे त्याचे नाव असून तो गोकाक तालुक्यातील कोण्णूर गावचा रहिवासी असल्याचे समजते. बुडालेल्या आणखी एका युवकाचा शोध सुरु आहे. कित्तूरचे पीएसआय देवराज उळागड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.